लोकांच्या पाठीमागे चाला...
"जो मूर्तिमंत धर्म बनून गेला. तो लहान बालकासारखाच होऊन जातो. मग त्याला विंचू दंश करीत नाही. जंगली पशू त्यावर झडप घालीत नाहीत. की,हिंस्त्र पक्षी त्याला चोच मारीत नाहीत !" ख-या ज्ञानाचा परिचय आपल्याला सदैव बालकाच्या नजरेतून जगाकडे पाहिले तरच होऊ शकतो. असे सांगणारा लाओत्से आजन्म आपल्यातील लहान मुल जपू शकला. असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेला लाओत्से बालकासारखा निरागस व निष्पाप होता. वृद्धत्वातही त्याला आपले शैशव जपता आले. लाओत्सेचे खरे नाव 'ली अर्ह' असे होते. 'ली' हे त्याचे आडनाव आणि 'अर्ह' हे त्याचे नावं. असे असले तरी तो जगामध्ये लाओत्से नावाने ओळखला गेला. लाओत्से याचा आणखी एक अर्थ आहे - प्राचीन गुरु,आचार्य अथवा तत्त्वज्ञ ! तसेच 'लाओ' म्हणजे शिक्षक. या अर्थाने 'लाओत्से' हे विशेषण अथवा सन्मानदर्शक शब्द पदवीप्रमाणे या महान आचार्याला,धर्मसंस्थापकाला,तत्त्वज्ञाला जाणत्यांनी आदरपूर्वक बहाल केले होते. लाओत्सेच्या शिकवणूकीनुसार माणसाने स्वतःला कायम अपरिचित अथवा अज्ञात ठेवले पाहिजे. यासाठी त्याचे आणखी एक वचन महत्वाचे ठ...