तत्त्वज्ञाची जन्म कथा
इसवी सन पूर्व ५१० च्या आसपासचा काळ असावा. चीनमधील 'लू' राज्यामधील 'वियांग' नावाच्या शहरावर एका बंडखोर सेनानायकाने कब्जा केला होता. त्याच्या तावडीतून हे शहर परत मिळवण्याची जबाबदार लू राज्याची सैन्यातील एका तुकडीला देण्यात आली. बंडखोरांच्या नेत्याने हया तुकडीला शहरात बंदिस्त करून तिचा खातमा करण्याची योजना आखली. त्याने वियांग शहराचा मुख्य दरवाजा जाणीवपूर्वक उघडा ठेवून राजाच्या सैन्य तुकडीला आत येऊ दिले. सैन्याची तुकडी शहरात दाखल झाल्यानंतर शहराचा मुख्या दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न त्याचे साथीदार करू लागले. राजाच्या सैन्यातील एका पराक्रमी सैनिकाने बंडखोरांची ही चाल ओळखली. तो शहराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहचला आणि एकटयाने लढून आपल्या तुकडीतील सैनिकांना त्याने शहराच्या बाहेर काढले. त्याच्या या पराक्रमामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले. हया सैनिकाचे नाव 'शू०२३.लियांग हे' असे होते. शूलियांग हे चीनमधील 'कोंग' घराण्यातील होता. तेंव्हा घराण्याच्या अथवा कुळाच्या नावावरुनच गावाचे नाव असे. त्यामुळे शूलियांगच्या गावाचे नाव ...