बुद्धाच्या कुशीत विसावलेला 'शिंतो'
इसवी सनाच्या सहाव्या शतकात कोरियन द्विप समहातून बौद्ध धर्म जपानच्या धरतीवर अवतरला. तोपर्यंत जपानी समाज ज्या तत्त्वज्ञान व मूल्यव्यवस्थेला प्रमाण मानून जगत होता. जपानची संस्कृती आणि जीवन पद्धती ज्या तत्त्वज्ञान व मूल्यव्यवस्थेला उभी होती. त्याचे नामकरण झालेले नव्हते. सहाव्या शतकात बौद्ध धर्माच्या आगमनाने जपानी जगण्याला एक नाव मिळाले,ते म्हणजे 'शिंटो'. यालाच आज शिंटो धर्म म्हणून संबोधण्याची पद्धत रुढ झालेली आहे. बौद्ध धर्माचा जपानमध्ये प्रवेश होईपर्यंत धर्म ही संकल्पना जपानी समाजात अस्तित्वात नव्हती. बौद्ध धर्माच्या परिचयाने जपानी समाजाला पहिल्यांदाच एका संस्थात्मक धर्माचा परिचय झाला. वेगळया शब्दात सांगायचे म्हणजे जपानी समाजाला धर्म ही संकल्पनाच पहिल्यांदा समजली. त्यामुळे बौद्ध धर्माच्या आगमनापर्यंत जपान ज्या तत्त्वज्ञानावर,मूल्यांवर,श्रद्धांवर जगत होता. ज्यातून त्याने आपली समृद्ध अशी संस्कृती निर्माण केली होती. तिला त्याने काही नाव अथवा संबोधनच दिलेले नव्हते. बौद्ध धर्मामुळे आपल्या तोपर्यंतच्...