जगातील सर्वात तरुण धर्माची जन्मभूमी
हजारो वर्षांपासून भारतीय भूमीचा एक भूभाग सदैव रक्ताळलेला आहे. आाज ही या भूमीवर रक्त ओघळतच आहे. द्रविड,आर्य,ग्रीक,शक,पार्थियन्स,आयोनियन्स,बॅक्टि्रयन्स,हूण,मुसलमान आणि इतर अनेक लहान-सहान आक्रमणांना सर्वप्रथम छातीवर घेणारी ही मातीच काय,तर या भूमीवरून वाहणा-या रावी,चिनाब,सतलज,बियास आणि झेलम या पाच नदयांचे पाणी देखील लाल झाले होते. सिंधू आणि यमुना या नदयांच्या मधल्या भागातून वाहणा-या पाच नदयांनी वेढलेला हा भाग म्हणजे पंजाब. चिरंतन संघर्ष हा पंजाबचा स्थायी भावच झालेला दिसतो. याला कारण भारताच्या नकाशात त्याचे असलेले स्थान. पंजाबच्या उत्तर व पश्चिम दिशेला हिमालयाच्या रांगा दिमाखाने भारताचे संरक्षण करतात. हिमालयाच्या रांगांनी भारताचे संरक्षण जेवढे केले आहे,तेवढेच त्याच्यातील खिंडीनी आक्रमकांना भारताच्या भूमीवर येण्यासाठी वाट देखील दिली आहे. हिमालयातील काही खिंडी प्रागऐतिहासिक काळापासून यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. खैबर खिंड तर भारताच्या इतिहासातील सर्वज्ञात खिंड म्हणता येते. हिमालयाच्या दुर्गम पर्वतराजींमधून येणारा प्रत्येक आक्रमक पहिल्यांदा ज्या सखल भागात पोहचला तो म्हणजे...