दिगंबर-श्वेतांबर इत्यादी..
भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर जैन मुनींमध्ये तात्विक मतभेदांना सुरवात झाली. मुनींमधील हे मतभेद वाढत गेले. यामधून जैन धर्म दोन प्रमुख पंथांमध्ये विभाजीत झाला. हे दोन पंथ म्हणजे दिगंबर आणि श्वेतांबर. आजतागायत हे पंथ आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आहेत. मूलतत्ववाद आणि सुधारणावाद यांच्यातील भेदावर हे पंथ उभे आहेत. ख्रिश्चन धर्मात ज्याप्रमाणे मार्टिन ल्यूथरच्या धर्मकांतीनंतर प्रोटेस्टेंट पंथ निर्माण झाला. त्यानंतर मूलतत्त्ववादी म्हणजे कथोलीक आणि सुधारणावादी म्हणजे प्रोटेस्टेंट असे भेद निश्चित झाले. तसेच जैन धर्मातील दिंगबर हा पंथ जैन तत्त्वज्ञानाच्या मूलतत्त्वांशी निगडीत आहे. दिंगबर आणि श्वेतांबर या दोन पंथात झालेल्या जैन धर्माच्या विभाजनाविषयी वेगवेगळया कथा व कारणं सांगितली जातात. महावीरांच्या पूर्वीपासून स्थविरकल्प व जिनकल्प या नावाचे दोन पंथ अस्तित्वात होते. स्थविरकल्प पंथाचे लोकवस्त्रे वापरीत असत आणि जिनकल्प पंथांतल्या एकाशाखेचे लोकवस्त्र धारण करीत नसत. महावीरांनी हया दोन्ही पंथांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. महावीरांच्या निर्वाणांनंतर चद्रंगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत...