दमनकारी कायदे आणि स्वातंत्र्ययुद्ध...
स्वातंत्र्य मानवच नव्हे ,तर प्रत्येक सजिवाचा श्वास असतो. भौतिक परिस्थिती आणि स्वातंत्र्य भावना यांच्यात दुरान्वयाने संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. साखळदंड सोन्याचे आहेत किंवा खाण्यासाठी मोत्याचे दाणे आहेत. हे स्वातंत्र्यापुढे कवडीमोल असते. लोकशाही राज्यपद्धती मानवी स्वातंत्र्याची आदर्श अवस्था समजली जाते. लोकशाहीच्या मुखवटयाखाली हुकूमशाही वावरत असते. हे देखील नाकारता येत नाही. असे असले तरी लोकशाहीच्या मुखवटयापायी हुकूमशाहीला आवर घालणे शक्य असते. भारतीय राज्यघटनेने एका अत्यंत आदर्श व प्रगल्भ लोकशाहीच्या पायावर स्वतंत्र भारताला उभे केले आहे. संविधानाला अपेक्षित लोकशाही शंभर टक्के अवतरली नाही. हे विदारक वास्तव आहे. एक मात्र तेवढेच खरे आहे की त्यामुळे स्वतंत्र भारतातील हुकूमशाहीच्या अनेक लाटा आजवर भारतीय जनतेने परतवलेल्या आहेत. संसदीय लोकशाहीचा पहिला प्रयोग करणा-या इंग्लंडला इतरांच्या बाबतीत प्रत्येक सजिवाचा मूलभूत अधिकार असणा-या स्वातंत्र्याचा सोयीस्कर विसर पडला. भारताप्रमाणेच जगाने ते अनुभवले. इंग्लंडचा इतिहास पाहता आपत्ती आणि महानता अशा दोन्ही स्थितींचा अनुभव या देशाने घेतला....