आम्ही जातो आमुच्या गावा..
"आता सर्व काही संपले आहे. मला आजवरच्या आयुष्यात असा एकही माणूस मिळाला नाही. ज्याला स्वतःच्या चूकांची जाणीव झाली आहे आणि जो त्यांना सुधारण्याची ईच्छा ठेवतो." जीवनविषयी सर्वाथाने हताश कन्फ्यूशियस आपला शिष्य जिलू याला सांगत होता. इसवी सन पूर्व ४८१ मध्ये जिलू वेईच्या राजाचा एक विनंतीपूर्ण संदेश घेऊन आपल्या आचार्यांकडे आला होता. वेईच्या राजाला त्याचे सामंत त्रास देत होते आणि त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला होता. अशावेळी त्याला कन्फ्यूशियससारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता होती. जिलू वेईच्या राजाचा सल्लागार होता. त्यामुळे तो राजाचा संदेश घेऊन कन्फ्यूशियसकडे आला होता. आचार्यांनी दिलेला नकार पाहून जिलूने जिगोंगला आपल्यासोबत येण्याची विनंती केली. त्यानी देखील हा प्रस्ताव अमान्य केला. अखेर जिलू एकटाचा वेईला परतला. त्याने सगळयांचा निरोप घेतला. तो त्याचा अखेरचा निरोप ठरला. तो आता कधीच परतणार नव्हता आणि क्रूर नियती कन्फ्यूशियसची साथ सोडणार नव्हती. कन्फ्यूशियस आपल्या या प्रिय शिष...