Posts

आम्ही जातो आमुच्या गावा..

Image
"आता सर्व काही संपले आहे.  मला आजवरच्या आयुष्यात असा एकही माणूस मिळाला नाही. ज्याला स्वतःच्या चूकांची जाणीव झाली आहे आणि जो त्यांना सुधारण्याची ईच्छा ठेवतो."  जीवनविषयी सर्वाथाने हताश कन्फ्यूशियस आपला शिष्य जिलू याला सांगत होता.  इसवी सन पूर्व ४८१ मध्ये जिलू वेईच्या राजाचा एक विनंतीपूर्ण संदेश घेऊन आपल्या आचार्यांकडे आला होता.  वेईच्या राजाला त्याचे सामंत त्रास देत होते आणि त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला होता.  अशावेळी त्याला कन्फ्यूशियससारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता होती.  जिलू वेईच्या राजाचा सल्लागार होता.  त्यामुळे तो राजाचा संदेश घेऊन कन्फ्यूशियसकडे आला होता.  आचार्यांनी दिलेला नकार पाहून जिलूने जिगोंगला आपल्यासोबत येण्याची विनंती केली.  त्यानी देखील हा प्रस्ताव अमान्य केला.  अखेर जिलू एकटाचा वेईला परतला.  त्याने सगळयांचा निरोप घेतला.  तो त्याचा अखेरचा निरोप ठरला.  तो आता कधीच परतणार नव्हता आणि क्रूर नियती कन्फ्यूशियसची साथ सोडणार नव्हती.  कन्फ्यूशियस आपल्या या प्रिय शिष्याला कायम सोबत ठेवू ईच्छित होता.  मात्र नियतीला जिलू कन्फ्

मूर्तिभंजक नेता

Image
"माझी आई रात्री मला भेटायला यायची,मी झोपेपर्यंत ती मला कुशीत घेऊन पडून असायची.  मला झोप लागल्यानंतर ती निघून जायची.  मी जेंव्हा झोपतून उठायचो तर ती माझ्याजवळ नसायची."  हे विधान आपल्या नानाविध प्रश्नांचे मोहळ उभं करू शकते.  हे एखाद्या लहान मुलांचे स्वप्न अथवा कल्पना विश्व असावे असे देखील वाटून जाते.  अशा सर्व तर्क-विर्तकांच्या पल्याड उभे असलेले हे सात वर्षाच्या एका नीग्रो मुलाचे दाहक बालविश्व आहे.  गुलाम आईच्या पोटी गो-या मालकाकडून जन्माला आलेले हे गुलाम बाळ.  आईपासून तोडून १२ मैलांवरील दुस-या मालकाकडे सोपवण्यात आले.  गो-या मालकाच्या वासना तृप्तीच्या कारणामुळे म्हणा अथवा गुलामांचे उत्पादन करण्याच्या भांडवली धोरणामुळे म्हणा हे बाळ त्या मातेच्या माध्यमातून हया जगात अवतरले.  त्या आईला गो-या मालकाच्या हेतूशी मतलब नव्हता.  तिच्यासाठी ते केवळ तिचे बाळ होते.  आपल्या बाळाला भेटण्यासाठी ही आई रात्री बारा मैल चालून यायची.  बाळ झोपेपर्यंत त्याला आपल्या उबदार कुशीत घेऊन तिच्या करपलेल्या जीवनाला व मनाला शीतलता मिळवण्याचा वेडा प्रयत्न करायची.  बाळ झोपी गेल्यावर परत बारा मैल चालू

युगकर्त्याचे अखेरचे पर्व

Image
"मला कोणीही समजू शकले नाही. मला स्वर्गाविषयी म्हणजेच मृत्युविषयी कोणतीच तक्रार  नाही.  आयुष्यात मी अत्यंत प्राथमिक स्तरापासून अध्ययन करुन ज्ञानाच्या शिखराला स्पर्श करत आलो आहे.  त्यामुळे मला कोण समजू शकणार आहे ?  आता मला फक्त  स्वर्गच समजू शकेल."  कन्फ्यूशियस आपला शिष्य जिगोंग याला सांगत होता.  व्यवस्थेकडून नाकारल्या गेल्यामुळे त्याला असले नैराश्य आले होते.  तो नैराश्याचा सामना करत असातांनाच 'लू' राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत होती.  'वेई' चा राजा लिंग याचे निधन होऊन 'चे' नवा राजा झाला होता.  राजा चे याने कन्फ्यूशियसला आपला सल्लागार म्हणून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.  यामुळे कन्फ्यूशियसच्या शिष्यांना आनंद झाला आणि ते उत्साहीत झाले होते.  राजा चे राज्यातील यादवीमुळे त्रस्त होता.  त्याचे सरंजामदार त्याची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते.  अशावेळी 'वेई' आणि 'लू' राज्यांत तणाव निर्माण झाला.  वेई राज्य हे लू राज्यापेक्षा सामर्थ्यशील असल्याने वेई राज्याने लू राज्याचा सीमेतील एका योद्धयाच्या समाधी स्थळावर आपला हक्क सांगितला

उपेक्षेच्या मातीत दडलेले सोनं

Image
"मित्रांनो ! आपल्या आचार्यांच्या जीवनातील अशा दुर्दशेने व्यथित होण्याचे काहिच कारण नाही.  हे जग प्रदिर्घ काळापासून चूकीच्या मार्गावर चालत आलेले आहे.  मात्र परमेश्वर हया जगाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी तुमच्या आचार्यांचा उपयोग करणार आहे."  'चू' राज्यातून हताश होऊन परत असलेला कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना धीर देत होता.  'वेई' च्या सीमेवरील एका सुरक्षा रक्षकाने केलेल्या हृदय स्वागताने नव्या आशेनं पुलकित झालेल्या कन्फ्यूशियसचे हे बोल घोर निराशेत स्वतःला आणि शिष्यांना आधार देणारे वाटत होते.  कारण त्याच्या भवतालच्या अंधःकारत ही आशाच काडीचा आधार होती.  वेई राज्याचा त्याग केलेला कन्फ्यूशियस आणि त्याचे शिष्य परत वेई राज्यात परतत होते.  दरम्यानच्या काळात निर्वासित व नाकारल्या गेलेल्या जीवनाचे अधिक अनुभव त्यांच्या गाठीला होते.  वेई राज्याचा त्याग करुन  कन्फ्यूशियस आणि त्याच्या शिष्यांच्या बैलगाडीने 'सोंग' राज्याचा रस्ता धरला होता.  सोंग हे कन्फ्यूशियसच्या पितृक घराण्याचे मुळ राज्य होते.  एका अर्थानं कन्फ्यूशियस आपल्या पितृक भूमीकडे परतला होता.  त्याच्या

काजव्यांच्या प्रकाशात लपलेला सूर्य

Image
अनेक अडचणींचा सामना करत 'क्वी' राज्याच्या सीमेवर कन्फ्यूशियसची बैलगाडी येऊन थांबली.  त्याच्यासोबत त्याचे शिष्य जिलू,जिगोंग आणि यान देखील होते.  'क्वी' चा राजा जिंगकडे कन्फ्यूशियस मोठया आशेनं आला होता.  आपला शिष्य राजा जिंग नक्कीच आपल्याला स्वीकारेल याची त्याला खात्री होती.  सीमेवर पोहचल्यानंतर कन्फ्यूशियला सत्ताधा-यांच्या वास्तव चेहरा पाहण्याची संधी मिळाली.  त्याची बैलगाडी सीमेवर थांबवण्यात आली आणि त्याला 'क्वी' राज्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.  राजा जिंग हा अत्यंत धोरणी आणि कावेबाज शासक होता.  कन्फ्यूशियसचा 'लू' राज्यातील निःशस्त्रीकरणाचा प्रयोग आणि त्याचा परिणाम यासंदर्भात त्याला संपूर्ण माहिती मिळाली होती.  आपल्या राज्यात हा आदर्श प्रयोग करुन आपले सिंहासन धोक्यात आणण्याचा मुर्खपणा त्याला करायाचा नव्हता.  कन्फ्यूशियससारख्या तत्त्वज्ञाला आपल्या राज्यात प्रवेश देणे म्हणजे त्याला आदर्श राज्याच्या संकल्पनेतील प्रयोगांना प्रयोगशाळा उपलब्ध करुन देणे आणि स्वतःच्या सत्तेला ग्रहण लावणे.  हे त्याला नेमके माहित होते.  कोणत्याही राज्यकर्त्याला

शांतीदूताचे निर्वासन

Image
"महाशय आपले मन अथांग वेदनेने भरलेले दिसते.  आपल्याला केवळ एकाच प्रकारची धून वाजवता येते का? जर आपल्याकडे कोणी लक्ष देत नसेल तर आपण ही परोपकारच्या भावनेचा त्याग केला पाहिजे.  ही म्हण आपल्याला माहित नाही का? जर आपल्याला पोहता येत नसेल तर अशी एखादी जागा शोधा,जेथून आपण पायी चालत सहजपणे नदी पार करू शकतो."  एक अशिक्षित माणूस आपल्या डोक्यावरील धान्याचे बाचकं खाली ठेवत वाद्य वाजवणा-या कन्फ्यूशियस जवळ बसला.  'वेई' राज्याच्या राजधानीच्या शहरात आपल्या छोटयाशा भाडयाच्या घरासमोर अंत्यविधी प्रसंगी वाजवण्यात येणा-या संगीताची धून वाजवत बसलेल्या कन्फ्यूशियसची तंद्री हया माणसाच्या बोलण्याने भंग पावली.  त्या अशिक्षित माणसाच्या शब्दांमधील जीवनसंदेश त्याच्या अंतरमनापर्यंत पोहचला.  अचानक भानावर आलेल्या कन्फ्यूशियसने,"आपण अत्यंत योग्य सांगत आहात."  अशी प्रतिकिया दिली.  जणू काही त्या माणसाच्या जीवंत जीवनानुभवाने कन्फ्यूशियसच्या मनातील सर्व विषाद संपुष्टात आला होता. मात्र त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला होता. ही घटना होती इसवी सन पूर्व ४९८ सालातील.  'लू' रा

तत्त्वज्ञाची राजकीय कूटनिती..

Image
"कोणताही प्रामाणिक आणि जनकल्याणाची आस असलेला शासक स्वतःवरील टिकेचे सदैव स्वागत करत असतो.  तसेच जर त्याचे काही चूकत असेल तर त्यात सुधारणा करण्यात त्याला कोणाताही कमीपणा वाटत नाही."  असे कन्फ्यूशियस 'लू' चा राजा डिंग याला सांगत होता.  डिंग अत्यंत गांभीर्याने कन्फ्यूशियसचे विचार ऐकत होता आणि त्याप्रमाणे आपल्या शासनात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होता.  कन्फ्यूशियस आता लू राज्याचा मंत्रीमंडळाचाही सद्स्य बनला होता.  आपण आपले काम अत्यंत सचोटी आणि प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.  याची जाणीव कन्फ्यूशियसला होती.  कारण त्याला राज्यकारभारत आपले तत्त्वज्ञान आणि त्याला अपेक्षित आदर्श प्रणाली राबवायची असेल तर स्वतःच्या प्रशासनातूनच याचा आदर्श निर्माण करावा लागणार होता.  त्यामुळे चेंगडू जिल्हयाचा प्रशासक म्हणून त्यानं अतिशय प्रभावी काम करण्यावर लक्ष केंद्रित केले.  एका वर्षातच त्याचे सुशासन पाहून राजा डिंग याने कन्फ्यूशियसची आपल्या मंत्रीमंडळात 'सार्वजनिक कार्य' मंत्री म्हणून नियुक्त केली. त्याचवेळी क्वी चा राजा देखील सुशासनासाठी त्याचे मार्गदर्शन घेत होता.  राज्याच्