Posts

कागदाने अमेरिका पेटवला...

Image
स्टॅम्प ॲक्टच्या नावाखाली अमेरिकेवर व्यापारी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न इंग्लंडने केला. अमेरिकन जनतेच्या दमन आणि शोषणावर समृद्धीचा उपभोग घेणा-या इंग्लंडला कायमचा धडा शिकविण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. १ नोव्हेंबर १७६५ ला ब्रिटिश संसदेने स्टॅम्प ॲक्ट मंजूर केला. कागदाच्या माध्यमातून अमेरिकेवर नवीन कर लादण्याचा हा कायदा होता. तसेच नकळतपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा छुपा प्रयत्न देखील होता. स्टॅम्प ॲक्टनुसार अमेरिकेत जे काही कागदावर छापण्यात येईल ते इंग्लंडवरून कर भरल्याचा शिक्का मारुन आलेल्या कागदावरच छापले जाईल. ईतर कोणत्याही कागदाचा उपयोग कोणताही मजकूर छापण्यासाठी करता येणार नाही. अमेरिकेतील सर्व कायदेशीर कागदपत्रे,वर्तमानपत्रे,मासिके अशा सर्व प्रकारच्या प्रकाशनासाठी इंग्लंडचा स्टॅम्प असलेला कागदच लागेल. आर्थिक शोषणाला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जनहिताचा लेप देण्यात आला होता. अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्यासाठी ज्या ब्रिटिश फौजा तैनात करण्यात आल्या होत्या,त्यांचा खर्च या करातून भागविण्यात येणार होता. दुस-या शब्दात हा एकप्रकारचा संरक्षण कर होता. एका नवीन स्वतंत्...

सच्चा सौदा...

Image
वयाची सोळा वर्ष उलटलेल्या नानकांचा विवाह करण्याची माता-पित्यांची तीव्र ईच्छा होती. नानकदेव मात्र कोणत्याही संसारीक कामात लक्ष घालत नव्हते. पिता काळूराम यांची आर्थिक परिस्थिती चांगली असली,तरी विवाहासाठी मुलगा कर्तबगार असणे आवश्यक होते. नानक कमवते झाले नाही,तर त्यांना कोणीही आपली मुलगी देणार नाही. याची कल्पना व काळजी असल्याने माता-पित्यानीं एक योजना आखली. तळवंडी गावात गावोगाव फिरून व्यापार करणारे काही लोक होते. हे लोक आपले व्यापारी तांडे घेऊन विविध  भागात प्रवास करत. व्यापार नफा कमावून तळवंडीला परतत. गावातील अशा व्यापारी तांडयांसोबत नानकांना व्यापारासाठी पाठवावे,ज्यामुळे ते व्यापार-उदिमाचे कौशल्य,अनुभव आणि व्यावहारिक ज्ञान प्राप्त करू शकतील. अशी कल्पना काळूरामांच्या मनात आली. नानकदेवांनी पित्याच्या ईच्छेचा मान ठेवला. काळूरामांनी वीस रूपये भांडवल म्हणून व्यापारासाठी त्यांना दिले. तसेच 'बाला' नावाचा त्यांचा एक अत्यंत विश्वासू नोकर नानकांनासोबत म्हणून दिला. तळवंडीचा व्यापारी तांडा व्यापारासाठी बाहेर पडला. तळवंडीपासून बारा मैलांवर असणा-या 'चूहङ्काणा' नावाच्या गावा...

तळवंडीची तपोभूमी..

Image
तळवंडी गावात नानकदेवांचे बालपण निसर्गाच्या सहवासात व्यतीत होत होते. तळवंडीचा निसर्ग त्यांच्या साधनेला अत्यंत अनुकुल ठरला. मुंजेच्या प्रसंगाने नानकदेवांचे असामान्यत्व जवळपासच्या लोकांनी अनुभवले होते. त्यांची  ज्ञानसंपन्नता एव्हाना तळवंडीच्या लोकांच्या लक्षात आलेली होती. सत्वगुण अंगी बाणूवन विमल आचरण करणं हे जानवं धारण करण्यासारखंच आहे. परमेश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवणे,त्याचे नित्य स्मरण ठेवून त्याचा आदेश पालन करणं हे एक प्रकारचं जानवंच होय. हेच आपल्या शाश्वत उपयोगाचे आणि इहलोक-परलोकात सुखी असण्याचं साधन आहे. अशा जानव्यानं कोणाही साधकाला अलौकिक आनंदाचा ठेवाच मिळतो. म्हणून तेच मी धारण केलेलं आहे. हे नानकदेवांनी बाहय जगात माळा-मुद्रांचे भूषणे मिरवणा-या,त्याचे स्तोम माजवणा-या आणि त्याच्या जीवावर विनासायास पोट भरणा-या लोकांना दिलेले सणसणीत उत्तर तळवंडी परिसराला अंचबित करून गेले होते. जन्मजात ज्ञानसंपन्न नानकदेवांचा करारीपणा देखील लोक अनुभवत होते. मुंजेच्या प्रसंगानंतर त्यांनी लोकांचा काहीसा विरोध देखील अनुभवला. सामान्य लोक असे प्रसंग लवकर विसरतात,कारण त्यांचा कोणताही स...

दमनकारी कायदे आणि स्वातंत्र्ययुद्ध...

Image
स्वातंत्र्य मानवच नव्हे ,तर प्रत्येक सजिवाचा श्वास असतो. भौतिक परिस्थिती आणि स्वातंत्र्य भावना यांच्यात दुरान्वयाने संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. साखळदंड सोन्याचे आहेत किंवा खाण्यासाठी मोत्याचे दाणे आहेत. हे स्वातंत्र्यापुढे कवडीमोल असते. लोकशाही राज्यपद्धती मानवी स्वातंत्र्याची आदर्श अवस्था समजली जाते. लोकशाहीच्या मुखवटयाखाली हुकूमशाही वावरत असते. हे देखील नाकारता येत नाही. असे असले तरी लोकशाहीच्या मुखवटयापायी हुकूमशाहीला आवर घालणे शक्य असते. भारतीय राज्यघटनेने एका अत्यंत आदर्श व प्रगल्भ लोकशाहीच्या पायावर स्वतंत्र भारताला उभे केले आहे. संविधानाला अपेक्षित लोकशाही शंभर टक्के अवतरली नाही. हे विदारक वास्तव आहे. एक मात्र तेवढेच खरे आहे की त्यामुळे स्वतंत्र भारतातील हुकूमशाहीच्या अनेक लाटा आजवर भारतीय जनतेने परतवलेल्या आहेत. संसदीय लोकशाहीचा पहिला प्रयोग करणा-या इंग्लंडला इतरांच्या बाबतीत प्रत्येक सजिवाचा मूलभूत अधिकार असणा-या स्वातंत्र्याचा सोयीस्कर विसर पडला. भारताप्रमाणेच जगाने ते अनुभवले. इंग्लंडचा इतिहास पाहता आपत्ती आणि महानता अशा दोन्ही स्थितींचा अनुभव या देशाने घेतला....

जानवे नव्हे जाणावे...

Image
तलवंडी रायन्नोयी गावात एक मुंज विधी आयोजित करण्यात आला होता. नऊ वर्षाचा एका मुलाचा हा उपनयन संस्कार होता. यजमान कुंटुंबाचे सर्व नातलग,गावकरी आणि प्रतिष्ठित नागरिक मुंजीसाठी उपस्थित होते. कारण तलवंडीमधील प्रतिष्ठित काळूराम मेहता यांच्या घरचा कार्यक्रम असल्याने कार्यक्रमाचा दिमाखच और होता. तलवंडी परिसरातील प्रसिद्ध पंडित हरदयाल नावाचा ब्राहमण मुंज विधीचे पौरोहित्य करत होता. मुंजेचे सर्व विधी यथासांग पार पडले. शेवटचा विधी होता,मुलाच्या गळयात यज्ञोपवित म्हणजे जानव घालण्याचा. पंडित हरदयाल मुलाच्या गळयात जानव घालू लागला,तसे एक अघटित घडले. ज्याची मुंज होत होती,त्या नऊ वर्षाच्या मुलाने जानव घालण्यास नकार दिला. त्याचबरोबर त्याने हरदयालच्या हातातून जानव हिसाकावून घेतले आणि त्याला प्रश्न केला,"पंडितजी,जानवे कशासाठी घालायचे? याचा उपयोग काय?" लहानग्याच्या प्रश्नाने हरदयाल अवाक झाला. आजवर त्याने असंख्य उपनयन संस्कार म्हणजेच मुंज विधी केले होते. परंतु असा प्रश्न आजवर कोणी विचारला नव्हता किंवा कोणाला पडला ही नव्हता. गडबडलेला हरदयाल म्हणाला," या जानव्याच्या सूत्रात सर्व हिंदु...

'मिनिटमन' मावळे

Image
बोस्टन शहराची कोंडीकरून त्याला वठणीवर आणण्यासाठी ब्रिटिश सत्तेने सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याचा उलटा परिणाम असा झाला की अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला प्रारंभ झाला. बोस्टनजवळील लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड या दोन शहरातून स्वातंत्र्य लढयाचा बिगुल वाजला. लेक्झिंगटन आणि कॉंकार्ड ही शहरे बोस्टन व सध्याच्या आर्लिंगटन शहराजवळ आहेत. या दोन शहरात ब्रिटिश फौजांविरूद्ध सशस्त्र उठाव झाला आणि अमेरिकन स्वातंत्र्यलढयाला आरंभ झाला. अमेरिकन स्वातंत्र्यढयात एक अभिनव कल्पना समोर आली. ती म्हणजे मिनिटमन. स्वातंत्र्यलढयातील क्रांतीकारकांनी मिनिटमन ही संकल्पना निर्माण केली. स्वातंत्र्ययोद्धांनी एक गट स्थापन केला ज्याला मिनिटमन असे नाव देण्यात आले. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणा-या क्रांतीकारकांपैकी २५% लोक मिनिटमन झाले होते. संदेशवहनाचे एक अत्यंत प्रभावी व जलद जाळे मिनिटमनांनी निर्माण केले. ब्रिटिश फौजांच्या प्रत्येक हालचालीची आणि योजनांची माहिती अत्यंत वेगाने क्रांतीकारकांपर्यंत पोहचविण्याचे काम मिनिटमन करत होते. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जगाने दखल घेतलेल्या आणि विविध देशांमधील क्रांतीमध्ये वापरण्यात आल...

रावीच्या काठावर...

Image
लाहोरपासून तीस मैल अंतरावर वसलेले एक छोटे गाव तलवंडी रायन्नोयी. गावाच्या जवळून वाहणा-या विस्तीर्ण रावी नदीचे हिरवे काठ तलवंडीच्या सौंदर्याची कल्पना करण्यास पुरसे. तसे हे जमिनदाराचे गाव होते. बारा गावाची जमिनदारी असणारे रायबुलार धर्मांतरीत मुसलमान,असले तरी अत्यंत सहिष्णू. त्यामुळे त्याच्या जमिनदारीत प्रजा त्याकाळाच्या तुलनेत सुखात होती. १५ एप्रिल १४६९ ला तलवंडीवासी आपल्या दैनंदिन व्यवहारात व्यस्त होते. जमिनदार रायबुलार यांचे कुळकर्णी होते,मेहता कल्याणदास. ते काळूराम नावाने तलवंडी परिसरात प्रसिद्ध होते. काळूराम रायबुलारांकडे कुळकर्णी असले,तरी एक सधन शेतकरी म्हणूनही त्यांचा लौकिक होता. त्यांची पत्नी त्रिपताका उर्फ तृत्पादेवी. आपल्या नावाप्रमाणेच एक प्रसन्न व गृहकर्तव्यदक्ष गृहिणी. त्यांना नानकी नावाची मुलगी. तिचा जन्म आपल्या आजोळी म्हणजे नानांच्या घरी झाला. आजोबांची म्हणजे नानांची लाडकी म्हणून तिचे नाव नानकी ठेवण्यात आले. काळूराम व तृप्तादेवी हे अत्यंत धर्मपरायण दांपत्य होते. त्यांच्या जीवनातील व तलवंडी गावातील वैशाख शु.३ विक्रम संवत् १५२६ अर्थात १५ एप्रिल १४६९ हा  एक सामा...