अभिनव शिक्षणाची प्रयोगशाळा...
''कोणी विद्यार्थी जिज्ञासू नसेल तर मी त्याला शिकवू शकत नाही." एक गुरु म्हणून कन्फ्यूशियसची ही पहिली अट होती. खरं पाहिले तर ती प्रत्येक शिक्षकाची अट असते. कन्फ्यूशियसच्या विद्यालयात अत्यंत नाममात्र दक्षिणेत विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहणाची संधी मिळत होती. त्यामुळे ते विद्यालय एका हाडाच्या शिक्षकाच्या हया एकमेव शर्तीवर चालणार यात कोणतीच शंका नाही. असे असले तरी समाजात असे काही विद्यार्थी असतात की त्यांच्यामध्ये ज्ञान मिळवण्याची इच्छा अफाट असली तरी बौद्धिक क्षमतेचा अभाव असतो. अशा काही विद्यार्थ्यांनी कन्फ्यूशियसच्या विद्यालयात प्रवेश घेतला होता. प्रत्यक्ष अध्यापन-अध्ययन प्रक्रिया प्रारंभ झाल्याशिवाय कोणताही शिक्षक विद्यार्थ्याचे मूल्यमापन करू शकत नाही. अशावेळी कन्फ्यूशियसच्या विद्यालयातील बुद्धिमान विद्यार्थ्यांना आपला गुरु अशा र्निबुद्धांवर आपला वेळ,उर्जा व ज्ञान यांचा व्यय करत आहे. त्याने शिष्य निवडतांना सावधानी बाळगली पाहिजे. याची खंत वाटत असे. ते याबद्दल कन्फ्यूशियसकडे तक्रार देखील करत. मात्र तो त्यांच्याशी...