माणसाच्या पूर्णत्वाचे निरव संगीत...
चीनच्या सीमवरील नाक्यावर वयोवृद्ध लाओत्से पोहचला होता. आपली काठी टेकवत प्रवासाने श्रमलेल्या त्याच्या जर्जर शरीराला काही काळ विसाव्याची गरज होती. घशाला कोरड पडली होती आणि पोट दोन घासांची मागणी करत होते. नाक्यावरील पहारेक-यांनी वृद्ध लाओत्सेकडे पाहिले. नावाने आणि तत्त्वज्ञानाने अवघ्या चीनला माहीत असलेला लाओत्से सीमेवरील पहारेक-यांना त्याकाळाचा विचार करता चेह-याने माहीत असणं शक्यच नव्हते. हा म्हातारा येथे कशाला आला असेल? याचा विचार करत असातांनाच लाओत्सेने त्यांच्याकडे पाणी मागीतले. म्हाता-याची वय आणि अवस्था पाहून पहारेक-यांनी तात्काळ पाणी, तर दिलेच त्यासोबत त्याला भोजन देखील दिले. अन्न-पाणी पोटात जाताच लाओत्सेच्या सुरकुत्यांनी भरलेला चेह-यावर तकवा जाणवू लागला. पहारेक-यांनी त्याला तेथे येण्याचे कारण विचारले तेंव्हा तो म्हणाला ,"मला चीन देशाच्या बाहेर जायचे आहे,म्हणून मी येथे आलो," असे सांगितले. पहारेकरी म्हणाले,"बाबा ! तुमच्यासोबत कोणी नाही ? तुम्हाला चीनमधून बाहेर पडून कोठे आणि कशासाठी जायचे आहे? एकटयाने प्रवास करण्यासारखी त...