शिर देईल पण धर्म..
गुरू तेगबहादुरांसमोर हात जोडून उभे असलेले काश्मिरी पंडित त्यांची कैफियत मांडत होते. 'असे काय झाले आहे?' असा प्रश्न गुरूजींनी केल्यावर एक काश्मिरी पंडित सामोरा झाला आणि म्हणाला,' गुरूजी,आपण औरंगजेबाच्या हिंदू विरोधी राज्यकारभार पाहत आहातच. त्याने काश्मिरमध्य नेमलेला आपला सुभेदार शेर अफगान याला एक हुकूमनामा पाठवला आहे. त्यानुसार काश्मिरमध्ये राहणा-या हिंदुना धर्मांतरीत करुन मुसलमान बनण्याचा घाट घातला आहे. त्याच्या हुकूमनाम्याने आमचे जगणे मुश्किल झाले आहे. शीख गुरूंनी कायमच हिंदू धर्माचे रक्षण केले आहे. म्हणूनच आम्ही आपण आमचे रक्षण करावे. अशी अपेक्षा आणि आशा घेऊन आलो आहोत. आपण नक्कीच आमचे रक्षण कराल. असा आम्हांला विश्वास आहे.' काश्मिरी पंडितांचे हे निवेदन ऐकून तेगबहादुरजी गहन विचारात पडले. औरंगजेब देशाचा शासक होता. त्याने असा धर्मवेडेपणा करावा आणि आपल्या प्रजेत भेदभाव करावा हे त्यांना कदापि मान्य नव्हते. राजासाठी कायम राजधर्म महत्वाचा असतो,अन्य कोणताही धर्म नाही. असे त्यांचे स्पष्ट मत होते. गुरू नानकदेवांपासून जे...