मातृसत्तेचा उपासक तत्त्ववेत्ता
कन्फ्यूशियस चे शिक्षण पूर्ण झाले. त्याचा मित्र राजकुमार मित्र 'नांगोंग जिंग्सू' आपल्या राज्यात परतला. त्याला त्याच्या 'मेंग' राज्याची प्रशासकीय जबाबदारी सांभाळायची होती. कन्फ्यूशियस देखील घरी परतला. हया दोघा मित्रांच्या वाटा काही काळासाठी वेगळया झाल्या असल्या तरी ते जीवनभर सोबत असणार होते. जिंग्सू हा कन्फ्यूशियसच्या जीवनाचा मुख्य आधार म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणार होता. कन्फ्यूशियस घरी गेल्यानंतर काही दिवसातच त्याची आई झेंगझाईने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आपल्या मुलाची महान कर्तबगारी पाहण्याचे सौख्य देखील हया मातेला लाभले नाही. तिचे जीवन म्हणजे केवळ संघर्ष आणि दुःख यांची गाथा ठरले. असे असले तरी कन्फ्यूशियसला त्याच्या आजोळच्या यान परिवाराने कधी अंतर पडू दिले नाही. झेंगझाईनं आपल्या मृत्यूच्या काही काळ आधीच त्याचा विवाह तिच्या 'यान' परिवारातील एका मुलीसोबत निश्चत केला होता. हया मुलीचे नाव 'जाई वो' असे होते. त्यावेळी सतरा वर्षांच्या असलेल्या कन्फ्यूशियसला शिक्षणासाठी दिलेल्या ...