शापितांची संजीवनी
सन १६१० साली एक जहाज जेम्स नदीकिनारी वसलेल्या जेम्स टाऊनला पोहचले . अशी भयान , विराण आणि निर्मनुष्य वस्ती म्हणजेच जेम्स टाऊन आहे . यावर जहाजातील इंग्रंज प्रवाशांचा विश्वास बसत नव्हता . वस्तीत उभे असलेले चर्च त्यांना दिसले . चर्चचा घंटानाद करावा , जेणे क रु न येथे कोणी जिवंत माणूस असल्यास तो आपल्या पर्यंत येईल . अशा विचारातून त्यांनी चर्च बेल वाजवण्यास सुरवात केली . ब-याच वेळानंतर काही भयग्रस्त चेहरे चर्चच्या प्रांगणात नजरेने अंदाज बांधत प्रकट झाले . अर्धनग्न व भूकेने व्याकूळ ६० जेम्स टाऊनवासीयांनी आपल्या देशबांधवानां ओळखले . जेम्स टाऊनच्या नरकयातनांमधून सुटकेचा किरण दिसताच . त्यांचे काळवंडलेले चेहरे उजळले . अनेक दिवसांच्या उपासमारीने अर्धमेले झालेल्या या लोकांच्या पायात एक नवीन बळ संचारले . त्यांनी आपल्या देशबांधवांकडे धाव घेतली . त्यांची हकिकत ऐकून नव्याने जेम्स टाऊनमध्ये प्रवेश केलेले त्यांचे देशबांधव सुन्न झाले . जॉन स्मिथच्या अथक प्रयासामुळे जेम्स टाऊनने बाळसे धरले होते . स्थानिक जमातींशी सौहादर्यपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याने जीवाचे भय संपले आणि अन्नाचीही भ्रा...