Posts

सत्य-शिव-सुंदर' मानवाचा चित्रकथी...खलील जिब्रान(रसिक पुरवणी,दै.दिव्य मराठी)

Image
                        'सत्य-शिव-सुंदर' मानवाचा चित्रकथी... "तुम्ही मला विचारत आहात,की मी वेडा कसा झालो ? त्याचे झाले असे की एक दिवस सकाळी मी गाढ झोपेतून जागा झालो आणि पाहतो तर मी माझ्या चेह-यावर चढवलेले सर्व मुखवटे चोरीला गेले होते." दैनंदिन जीवनात अनेक मुखवटयांमध्ये स्वतःचा चेहरा हरवलेल्या प्रत्येक माणसाची व्यथा आपल्या 'पागल'(द मॅडमॅन) या कथेत व्यक्त करणारा भाववादी चिंतक,कवी,कथाकार व चित्रकार म्हणजे खलील जिब्रान. काव्य,कथा व चित्र यांना भावनीक चिंतनाच्या कोंदणात प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न हीच जिब्रानची कलानिर्मिती. उच्च कोटीचा तत्त्वज्ञानी असणा-या जिब्रानने तेवढयाच उच्च कोटीच्या कलानिर्मितीतून मुखवटयांमागील ख-या मानवी चेह-याचे सुंदर चित्रच रेखाटले आहे. जिब्रान तत्त्वज्ञ होता;परंतु त्याचे तत्वज्ञान रूक्ष व अतिवास्तवाच्या काटेरी कुंपणात जखडलेले नव्हते. माणसाच्या माणूसपणावर त्याचा गाढ विश्वास होता. जन्मजात कलावंत असलेल्या जिब्रानला,बालपणापासून चित्रकलेचे अंग लाभले होते. विविध आकार-आकृत्या त्याच्या मनःपटलावर ...

'मराठी भाषा गौरव ' दिन विशेष लेख

Image
                                             मराठीचा 'अभिजात ' संघर्ष दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात आपली  मातृभाषाविषयक अस्मिता क्षणिक का होईना,धारदार होते. सालाबादानुसार २७ फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ कुसमाग्रजांचा जन्मदिन आपण 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करतो. अनेकजण याला 'मराठी दिन ',' मराठी भाषा दिन','मराठी राजभाषा दिन' इत्यादी संबोधनं वापरतात,यातील ' गौरव'  शब्दाचा त्यांना सपशेल विसर पडलेला असतो वा त्यांना हे नेमकं माहितच नसते. विविध नामवंत मराठी दिनदर्शिंकांमध्ये देखील या दिनाबद्दल चूकीचे उल्लेख आढळतात. सहज निरिक्षण केल्यास महाराष्ट्रात प्रत्येक स्तरावर असा चूकीचा उल्लेख होतांना आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही.  'राजभाषा मराठी दिन' हा १ मे या दिवशी असतो,हे अनेकांना माहित नाही. यानिमित्त्याने विविध स्तरांवर भाषणं-व्याख्यानं-प्रवचनं यांचा महापूर आलेला,आपण याची देही याची डोळा अनुभवतो. आपल्याला याकाळात सर्व काही मराठीमय ...

गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज

Image
                 गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज '' हिंदू धर्मचेतना पूर्णपणे संचारलेला हिंदूंचा हिंदू असल्याचे मी स्वतःस समजतो. ज्यास आपण हिंदू शास्त्र म्हणतो,अशा सर्व पुस्तकांत,आपण विश्वास ठेवीत असलेल्या आणि पालन करीत असलेल्या अस्पृश्यतेच्या अस्तित्वासाठीचे एकही प्रमाण शोधण्यास मी अयशस्वी ठरलो आहे;परंतु इतर ठिकाणी मी वारंवार सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माने खरोखरच अस्पृश्यतेस नैतिक पाठबळ दिले असल्याचे मला आढळले,तर हिंदू धर्माचा त्याग करण्यास मी डळमळणार नाही.'' हे विधान आहे हिंदू धर्मावर असीमप्रेम करण्या-या महात्मा गांधी यांचे. जन्माने हिंदू असल्याचा गर्वाभिमान बाळगणारे गांधीजी या धर्मावर कलंक म्हणून सर्वात सखोल व अमिट ठसा असणा-या अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करतात. असे असले तरी गांधीजी आज ना हिंदूत्ववाद्यांना आपले वाटतात ना आंबेडकरवाद्यांना. देशाने 'राष्ट्रपित्या' चा दर्जा दिलेल्या, याच गांधीजींची १५०वी जयंती साजरी करण्याची तयारी होत असतांना,३०जानेवारीला त्यांच्या पुण्यतिथी ...

संकल्पनेतील धर्म

Image

आणि बुद्ध हसत आहे.

Image
   इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात असलेली गणराज्यात्मक लोकशाही व्यवस्था ध्वस्त करु   पाहणा-या साम्राज्यवादी शक्तींना बळकटी प्राप्त होऊ लागली. भौतिक , सामाजिक , राजकीय व वैचारिकदृष्टया संपन्न अशी ही गणराज्यं ' विनाशकाले विपरित बुद्धी ' या उक्तीनुसार आपापसात संघर्ष करत , साम्राज्यवादी एकाधिकारशाही प्रवृत्तीला बळी पडत होती. दुस-या बाजूला तत्कालीन वैदिक धर्म स्वतःच्या निर्माण केलेल्या अभेद्य तटबंदयांमध्ये अडकून पडला होता. धर्म म्हणजे कर्मकांड आणि समाज म्हणजे न बदलता येणारी जातीय उतरंड असा समज वैदिक धर्ममार्तडांनी दृढमुल केला होता. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस भरडला जात होता. एकूणच राजकीय असो वा धार्मिक अशा दोन्ही स्तरांवर क्रौर्य , व्यभिचार आणि अविवेक यांनी समाजाला ग्रासले असतांना ,' करु णा-शील-प्रज्ञा ' हा महामंत्र देणा-या भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. कपिलवस्तूच्या या शाक्यवंशीय राजपुत्राने जगातील पहिल्या विश्वव्यापक अशा बौद्ध धर्माची स्थापना केली. अलौकिक , काल्पनिक , अगोचर , कुट व गुढ संकल्पनांची मांडणी म्हणजे धर्मसिद्धांत आणि त्यांचा काथ्याकूट...

Raskin Bond

Image

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त दैनिक सार्वमत मध्ये प्रसिद्ध झालेला लेख"कृष्णाकाठचा कल्पवृक्ष"

Image
                                    कृष्णाकाठचा कल्पवृक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान असा अत्यंत यशस्वी राजकीय आलेख असलेल्या आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर आपला अमिट ठसा उमटवलेल्या एका नेत्याचे निधन होते. त्याने आपल्या मागे ठेवलेल्या संपत्तीची मोजदाद केली जाते. तेंव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलोपार्जित काही गुंठे जमिन आणि बँकेच्या खात्यात केवळ पंधरा हजार रूपयांची शिल्लक एवढेच ऐहिक संचित मागे ठेवलेला हा नेता म्हणजे आधुनिक महाराष्ट्रच नव्हे तर आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक स्व.यशवंतराव चव्हाण. आज हे सत्य कपोलकल्पित कथा वाटेल. हे सत्य या महाराष्ट्राने साक्षात अनुभवले आहे. वर्तमान राजकारण आणि राजकीय नेतृत्व यांचा भयाण अनुभव घेणा-या आजच्या युवापिढीला यावर विश्वास बसणे अशक्यच आहे. आर्थिक व शैक्षणिक अशा दोन्ही स्तरावर प्रतिकुल परिस्थितीत जन्मलेला हा मुलगा जीवनाच्या संघर्षात संकटांवर स्वार झाला. आपण प्रयत्नपूर्वक आपले व्यक्तिमत्व घडवायचे अशी खुणगाठ...