संचखंड ते सतनाम..
'धर्म साधूच्या ठिगळे लावलेल्या फाटक्या वस्त्रात नाही,तो त्याच्या हातातल्या दंडामध्येही बंदिस्त नाही,धर्म शरीरावर लावलेल्या भस्मातही नाही,धर्म कानांतल्या भिकबाळीमध्ये नाही,डोक्याच्या गुळगुळीत गोटयात नाही,धर्म शंख फुंकण्यातही नाही,तुम्हाला ख-याखु-या धर्माचा मार्ग पहायचा असेल,तर या अपवित्र जगात राहून आपले पावित्र्य जपा.' असा संदेश देतांना गुरू नानकदेवांनी धर्माचे सारच जणू व्यक्त केलेले दिसते एखादयाने बाहय स्वरूपात स्वतःला धार्मिक अथवा धर्मपरायाण सिद्ध करण्यासाठी केलेली रंगरंगोटी म्हणजे धर्म नव्हे,हे अत्यंत ठामपणे सांगतांना नानकदेवांनी धर्माची सहज-साधी व्याख्या केलेली दिसते. नानकदेवांनी येथे ढोंगी व दांभिक धर्ममार्तंडांचा बुरखा फाडलेला दिसतो. सुलतानपूर लोदी हे शहर म्हणजे नानकदेवांची तपोभूमी ठरू लागले होते. नोकरी आणि संसार अत्यंत नेटकेपणाने करणारे नानकदेव सुलातनपूरवासीयांना दिसत होते. तसेच त्यांच्यातील महात्म्याची अनुभूती देखील त्यांना येत होती. प्रपंचात व परमार्थात समर्थ साथ देणारी पत्नी आणि दोन पुत्र यामुळे त्यांचा संसार बहरला होता. आपल...