ऋजुवालुकेच्या तीरावरचा सूर्योदय
इसवी सन सहाशे वर्षांपूर्वीची मगध देशातील मध्यमपावा नगरी एक धार्मिक केंद्र म्हणून प्रख्यात होती. संस्कृती व वैदिक पंडित यांचे तर ते एक तीर्थस्थळच झाले होते. अशा मध्यमपावा नगरात सोमिल नामक एक धनाढय ब्राहमण राहत होता. त्याने एका विशाल महायज्ञाचे आयोजन केले. हा महायज्ञ केवळ मगध देशातच नव्हे , तर संपूर्ण उत्तर भारतात चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरला होता . उत्तर भारतातील सर्व वैदिकांना अशा महायज्ञात सहभागी होण्याचा मोह अनावर झाला होता. मोठ-मोठया नगरांपासून छोटया-छोटया खेडयांपर्यंत महायज्ञ ज्ञाची वार्ता पोहचली. हजारोंच्या संख्येने स्त्रीपु रु ष या महायज्ञाच्या पवित्र यज्ञज्वालेचे दर्शन घेण्यासाठी मध्यमपावेच्या दिशेन निघाले. पूर्व भारतातील अकारा दिग्गज विद्वान आपल्या ४४०० शिष्यांसह या महायज्ञात सहभागी झाले होते. याव रू न सामान्यजन किती प्रमाणात तेथे उपस्थित असतील , याची कल्पना आपण येवू शकते. महायज्ञाच्या अनुभूतीत बुडालेल्या श्रद्धाळूं चे भाग्य जोरावर होते. पवित्र यज्ञज्वालेसह त्यांना ऋ जु वा लु का नदीच्या तीरावर उदय पावलेल्या त्रिकालजयी ज्ञानसूर्याचे दर्शन व मार्गदर्शन लाभणा...