आत्मजयाचा महामेरू : भगवान महावीर
आत्मजयाचा महामेरू : भगवान महावीर
"जो सहस्सं सहस्साणं संगामे दुज्जए जिए
जिणेज्ज अप्पाणं एस सो परमो जयो"
दुर्जय अशा संग्रामात शत्रुच्या लक्षावधी योद्धांना जिंकण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या एका आत्म्यास जिंकणे कठीण आहे. आत्मजय हाच परमजय होय, असा संदेश देणा-या भगवान महावीरांनी जीवनाचा एक नवा महामार्ग भारतीय समाजाला दाखवला. महावीरांचा जन्म ख्रिस्तपूर्व सुमारे सहाशे वर्ष (५९९वर्षे) भारताच्या पूर्वांचलामध्ये झाला. ख्रिस्तपूर्व सहावे शतक हे जगाच्या इतिहासात एक क्रांतीकारी शतक मानले जाते. या कालखंडात संपूर्ण विश्वातील विचारवंतांची विचारधारा निसर्गाच्या अध्ययनाकडून समाज आणि जीवनातील समस्या यांच्या दिशेने वळलेली होती. अनेक क्रांन्तदर्शी महापुरŠष या कालात जगामध्ये होऊन गेले. भारतात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी कांतीचा उदáघोष केला. त्यांच्यासोबत इतरही काही महापुरूष उत्पन्न झाले. चीनमध्ये लाओत्से आणि कन्प‹यूशियस,ग्रीसमध्ये पायथागोरस,सॉक्रेटिस आणि प्लेटो,इराणमध्ये झरथुराष्टÈ अशा रीतीने या कालखंडात जुनाट धार्मिक समजूती,शोषक सामजिक परंपरा,धर्मिक अंधश्रद्धा,कर्मकांडे व सामजिक विषमता यांच्या विरोधात या महापुरŠषांनी बंड पुकारले. भगवान महावीर आणि भगवान बुद्ध हे दोन्ही महापुरŠष समकालीन समजले जातात. त्यांच्या चरित्रांचे अवलोकन केल्यास यात अनेक साम्यस्थळे देखील दिसून येतात. इसवी सनापूर्वी सातव्या-सहाव्या शतकात गंगेच्या उत्तर तीरावर वसलेले लिच्छवी क्षत्रियांचे विशाल व पराक्रमी गणराज्य वõभवाच्या अत्युच्च शिखरावर होते. वैशाली ही या गणराज्याची राजधानी होती.लिच्छवी हे सूर्यवंशी क्षत्रिय होते.ते स्वत:स श्रीरामाचे वंशज मानत. बुद्धपूर्व काळात या लिच्छवींना `विदेह` या नावाने ओळखले जायचे. अशा क्षत्रिय लिच्छवी वंशात कुंडपूरचा राजा सिद्धार्थ आणि त्यांची राणी त्रिशलादेवी यांच्या पोटी महावीरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब हे तीर्थंकर पार्श्वनाथांचे उपासक होते. ज्यावेळी तीर्थंकराचा आणि चक्रवर्ती पुरŠषाचा महान आत्मा एखाद्या भाग्यशाली मातेच्या उदरात प्रवेश करतो त्यावेळी त्या मातेला चौदा अत्यंत शुभ स्वप्ने पडतात अशी एक समजूत जैन परंपरेमध्ये रूढ आहे. महावीराच्या जन्मसमयी माता त्रिशलादेवींना अशीच एक अदáभूत व दिव्य अशी स्वप्नमलिका दिसली. त्यानुसार त्यांच्या उदरी मोहरुपी चिखलात फसलेल्या आत्मरथाचा उद्धार करण्यास समर्थ(श्वेतवðषभ),महान,बलिष्ठ व जगत श्रेष्ठ (श्वेतहस्ती ),निर्भय,पराकमी वीर(केशरीसिंह),तिन्ही लोकांतील समðद्धीचा स्वामी(लक्ष्मी),देखणा,सर्वमान्य,सर्वप्रिय(पुष्पमाला),मनोहर,जगाला शीतलता देणारा(चंद्रमंडल), अज्ञानांध:काराचा नाश करणारा(सूर्य),कुल व वंश यांची प्रतिष्ठा वाढविणारा (महाध्वज), अनेक गुण व विभूती यांना धारण करणारा (कलश),जगताचा पाप-ताप शांत करŠन शीतलता प्रदान करणारा(पद्मसरोवर), अपार गंभीरता व मधुरता यांचा समन्वय करणारा(क्षीरसमुद्र),दिव्यता धारण करणारा व देवांनाही पूज्य असणारा(देवविमान),समस्त गुणरुपी रत्नांचा समूह(रत्नराशी),कृरतेसारख्या दोषांपासून मुक्त व असाधरण तेज:संपन्न(जाज्वल्य अग्नी) असा पुत्र जन्म घेणार होता. महावीरांच्या व्यक्तिमत्वाचे अवलोकन केल्यास या स्वप्नाची सत्यता पटल्यशिवाय राहत नाही. महापुरुषांच्या जन्मकाली येणा-या सुखद व आनंददायक घटनांच प्रत्यय महावीरांच्या जन्मसमयी आला. जेंव्हापासून हे बालक त्रिशलादेवींच्या उदरात आले, तेंव्हापासून धन,धान्य,कोष्ठागार,स्वजन व राज्यकोष यांची सर्व प्रकारे अभिवðद्धी झाली,यामुळõ या पुत्राचे नाव पिता सिद्धार्थाने `वर्धमान` असे ठेवले. याशिवाय महावीर,सन्मति ही प्रमुख नावे आणि वीर, अतिवीर, अंत्यकाश्यप ही गौण नामे होती. महावीरांच्या जन्मसमयी असलेल्या धार्मिक,सामजिक व राजकीय परिस्थितीचा विचार करता आपल्याला महावीरांच्या कार्याचे मर्म समजू शकते. याकाळात धर्म म्हणजे केवळ कर्मकांड असे स्तोम ब्राह्मण वर्गाने माजवले होते. धर्माचे व समाजाचे सर्व अधिकार या वर्गाकडे होते.सर्व प्रकारचे पापाचरण करूनही आपण सदैव पवित्र व सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा हा वर्ग करत होता. जातीभेद व अस्पðश्यता यांनी अमानवीपणाचा कळस गाठला होता. स्त्रियांचे जीवन पराश्रित,उपेक्षित, अधिकारहीन होते. संपत्ती व पशुधन यांच्याप्रमाणे स्त्री ही परिग्रहवस्तू(गुलाम) म्हणून मानली गेली होती. मानवोपयोगी पशुंना राष्ट्रीय धन मानले जात असले आणि ज्यांच्या संरक्षणासाठी मेघरथ व नेमिनाथ यांच्यासारख्या महापुरुषांनी महान बलिदान केले असले,तरी ,त्या मूक पशूंना यज्ञयागाच्या नावाखाली बळी दिले जात होते. म्हणजेच नारी,शुद्र व पशू यांना जगण्याचा अधिकारच नाकारण्यात येत होता. राजकीय स्तरावर एक शक्तिमान राजा दुस-या दुर्बल राज्यावर आक्रमण करŠन तेथील जनतेचे शोषण करत होता,यामुळे गणराज्यांमध्ये असलेल्या लोकशाही समाजव्यवस्थेचा विनाश होत होता. यासर्व परस्थितीचा विचार केल्यानंतर वयाच्या ३१व्या वर्षी वर्धमानांनी पत्नी यशोदा,कन्या प्रियदर्शना आणि सर्व राजवõभवाचा त्याग केला आणि मार्गशीर्ष वद्य दशमीच्या दिवशाी चौथा प्रहरी राजभवनातून वनाकडे प्रस्थान केले. तत्पूर्वीच त्यांची साधक अवस्था प्रारंभ झालेली होती. भोगात योगाची साधना करणारे वर्धमान आता कठोर योगमार्गावरŠन एकाकी होऊन चालू लागले. कठोर तपश्चर्या करणा-या वर्धमानांना समाजाकडूनही पीडा सहन करावी लागली. तरी ते आपल्या मार्गावरŠन ढळले नाही. यामुळेच राजकुमार वर्धमान आता वर्धमान महावीर झाले. श्रमण वर्धमानांचे साधकजीवन हे या युगातील(अवसर्पिणी काळातील) एका श्रेष्ठतम साधकाचे जीवन होते. महावीरांच्या साधक जीवनाचा हा उज्ज्वल अध्याय समतेच्या साधनेपासून उगम पावून समतेच्या सिद्धीत समाप्त होतो. या वर्णमालेचा वर्ण `अभय`पासून आरंभ होऊन धीरता,वीरता,समता,क्षमा यांच्या साधनेच्या कमाने जाऊन शेवटी `ज्ञान`(केवलज्ञान) या स्थळी येऊन परिपूर्ण होतो. सम्रग जõन सहित्यामध्ये समग्र तीर्थंकरांच्या साधनेमध्ये महावीरांच्या साधनेचा अध्याय अद्वितीय असून आश्चर्यकारी आभेने उजळून निघाला आहे. ऋजुवालुका नदीच्या तटावर साधक महावीरांना कैवल्यज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी धर्मतीर्थ वा धर्मसंघाची स्थापना केली. गणराज्यांच्या लोकशाही वातावरणात वाढलेल्या महावीरांनी आपल्या धर्मसंघातही हीच लोकशाही रŠजवली. हजारो व्यक्तींना दीक्षा देणा-या महावीरांनी दीक्षा घेणा-या साधकाच्या शिक्षणाची व व्यवस्थेची सूत्रे आपल्या हाती ठेवली नाहीत,ती सुयोग्य व्यक्तिच्या हाती सोपवली. शासनाचा संबंध आत्मानुशासनाशी जोडून टाकला-एकप्रकारे सत्तेचे विकेंद्रीकरण केले. तत्कालीन लोकभाषा असलेल्या अर्धमागधी भाषेचा वापर त्यांनी आपल्या मध्यमपावा येथे दिलेल्या प्रवचनापासून केला आणी जैन साहित्याची भाषा देखील तीच ठेवली. कारण महावीरांचे विचार सर्वसामान्य बहुजन समाजासाठी होते. यामुळेच त्यांच्या सर्वागीण व सर्वव्यापी अहिंसा धर्माचा प्रचार-प्रसार झाला. जैन विचारधारा आणि २३ तीर्थकरांची परंपरा महावीरांच्या पूर्वीपासून अस्तित्वात असली तरी या विचारधारेला व परंपरेला धर्माचे एक सुयोग्य रŠप देण्याचे महान कार्य महावीरांनी केले. जैन धर्माच्या संस्थापकांविषयी विविध मतप्रवाह असले तरी महावीरांच्या या कार्यामुळे जैन धर्माचे संस्थापकत्व त्यांच्याकडेच जाते आणि जगही तसेच मानते. महावीरांच्या आणि त्यापूर्वीच्या तीर्थंकरांच्या महान विचारधारेवर उभा असलेला जैन धर्म कालानुरŠप दिंगबर व श्वेतांबर पंथात विभागलेला दिसत असला तरी या विचारधारेनुसार आचरण करण्यात कोठेही मागे नाही. संपूर्ण विश्वात आजमितीस केवळ ४५ ते ५० लाख लोकसंख्या असलेला जैन समाज व्यापार-उदिमात अग्रेसर तर आहेच ;परंतु दिगंबर व श्वेतांबर या दोन्ही पंथाच्या विविध सामजिक संस्था भारतभर मानव सेवेचे कार्य करत आहेत. यातूनच महावीरांच्या महान व कालजयी विचारधारेचा प्रत्यय येतो. आत्मजय,सम्यक दðष्टी आणि अखिल मानवजातीच्या सेवेचे निष्काम व्रत, हेच महावीरांच्या जीवन संघर्षाचे सार सांगता येते. प्रा.डॉ.राहुल हांडे, भ्रमणध्वनी – ८३०८१५५०८६
Comments
Post a Comment