अखेरचा हिंदू सम्राट...
अखेरचा हिंदू सम्राट... प्राचीन काळापासून भारतीय जनमानस हे पारमार्थिक मानसिकता जोपासत आले आहे. यामुळे लौकिक जीवनाची नोंद ठेवण्याची आश्यकता आपल्याला कधी जाणवलीच नाही. याचा परिणाम आपण आपल्या गौरवशाली इतिहासाचे जतन केले नाही. यामुळे आपला गौरव वृद्धिंगत करणा-या आपल्या महानायकांचा इतिहास आपण विसरलो. भारताचा असाच एक उपेक्षित महानायक म्हणजे 'भारतेश्वर पृथ्वीराज चौहान'. त्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारे तत्कालीन केवळ दोन ग्रंथ आज उपलब्ध आहेत. 'पृथ्वीराज रासो' आणि 'पृथ्वीराज विजय' हे दोन काव्य ग्रंथ हेच पृथ्वीराज चौहानाच्या इतिहासाचे प्रमुख स्त्रोत म्हणता येतात. हे काव्यग्रंथ असल्याने कवी कल्पनांमधून सत्य शोधण्याचे काम इतिहासकारांना करावे लागले. यामुळेच भारतीय व परकीय इतिहासकारांना पृथ्वीराजास योग्य न्याय देता आलेला नाही. इतिहासाच्या पटलावर ते एक उपेक्षित चरित्र ठरले. आपल्याला देखील संयोगितेचे हरण करणारा पृथ्वीराजच केवळ माहित असतो. वास्तविक पाहता सम्राट पृथ्वीराज एक महामानव, महान योद्धा, कुशल सेनानायक आणि बहुभाषक व सकल कला मर्मज्ञ ...
Comments
Post a Comment