गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज
गांधी-आंबेडकर महासमन्वय : काळाची गरज '' हिंदू धर्मचेतना पूर्णपणे संचारलेला हिंदूंचा हिंदू असल्याचे मी स्वतःस समजतो. ज्यास आपण हिंदू शास्त्र म्हणतो,अशा सर्व पुस्तकांत,आपण विश्वास ठेवीत असलेल्या आणि पालन करीत असलेल्या अस्पृश्यतेच्या अस्तित्वासाठीचे एकही प्रमाण शोधण्यास मी अयशस्वी ठरलो आहे;परंतु इतर ठिकाणी मी वारंवार सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माने खरोखरच अस्पृश्यतेस नैतिक पाठबळ दिले असल्याचे मला आढळले,तर हिंदू धर्माचा त्याग करण्यास मी डळमळणार नाही.'' हे विधान आहे हिंदू धर्मावर असीमप्रेम करण्या-या महात्मा गांधी यांचे. जन्माने हिंदू असल्याचा गर्वाभिमान बाळगणारे गांधीजी या धर्मावर कलंक म्हणून सर्वात सखोल व अमिट ठसा असणा-या अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करतात. असे असले तरी गांधीजी आज ना हिंदूत्ववाद्यांना आपले वाटतात ना आंबेडकरवाद्यांना. देशाने 'राष्ट्रपित्या' चा दर्जा दिलेल्या, याच गांधीजींची १५०वी जयंती साजरी करण्याची तयारी होत असतांना,३०जानेवारीला त्यांच्या पुण्यतिथी ...